नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान सीमेवर फायरिंग आणि गोळीबाराचे कर्णकर्कश आवाज आपल्या नेहमी ऐकायला मिळतात. पण रात्री अंतराळातून भारत पाक सीमा किती सुंदर दिसते, याचा अंदाजा तुम्हांला नसेल.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने नुकताच एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. हा भारत पाक सीमेचा रात्री घेतलेला फोटो आहे. हा खास फोटो अंतराळातून घेण्यात आला आहे. हा फोटो अंतराळ प्रवाशाने इंटरनॅशनल स्पेस सेंटरवरून काढला आहे. यात भारत वायव्येला दिसत आहे. भारतात खूप प्रकाश आहे.
या फोटोत एक नारंगी रंगाची चमकती पट्टी दिसत आहे. ती भारत पाक बॉर्डर आहे. या भागात लाइट्स लावण्यात आल्या आहेत. भारत पाक ही काही निवडक सीमांपैकी आहेत त्या अंधार पडल्यानंतरही स्पष्टपणे दिसतात. हा संपूर्ण भाग रात्रीच्या अंधारातही चमकतो. हा फोटो २३ सप्टेंबरला निकॉन के डी४ डिजिटल या कॅमेऱ्यातून घेतला आहे. कॅमेऱ्यासाठी २८ मिलीमीटरचा लेन्सचा प्रयोग केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.