रशियन लष्कराचं विमान कोसळल्यानं 92 जणांचा मृत्यू

रशियन लष्कराचं TU-154 हे विमान कोसळलं आहे. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे.

Updated: Dec 25, 2016, 04:05 PM IST
रशियन लष्कराचं विमान कोसळल्यानं 92 जणांचा मृत्यू  title=

सोची : रशियन लष्कराचं TU-154 हे विमान कोसळलं आहे. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत 92 जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

या 92 पैकी 82 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. यात रशियन पत्रकारांसह कलाकार आणि सैनिकांचा समावेश आहे. दक्षिण रशियातील सोची येथून या विमानानं उड्डाण केलं होतं.

सीरियाच्या लटाकीया प्रांतात जात असताना हे विमान रडारवरून बेपत्ता झालं. समाचार सेवा इंटरफेक्सच्या रिपोर्टनुसार, विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.२० मिनिटांनी उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर २० मिनिटांतच हे विमान रडारवरुन गायब झाले.