विद्यार्थ्यांनी शेअर केले शिक्षिकेचे खासगी फोटो!

इतिहासचे धडे देणाऱ्या एका शिक्षिकेला आपल्या वर्गातील मुलांच्या केलेल्या कारनाम्यामुळे खजिल व्हायला लागले आहे. या घटनेने खजिल झालेल्या शिक्षिकेने शाळेत येण्यास नकार दिला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 13, 2013, 04:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
इतिहासचे धडे देणाऱ्या एका शिक्षिकेला आपल्या वर्गातील मुलांच्या केलेल्या कारनाम्यामुळे खजिल व्हायला लागले आहे. या घटनेने खजिल झालेल्या शिक्षिकेने शाळेत येण्यास नकार दिला आहे.
या शाळेतील विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या लॅपटॉपमधील परीक्षेचा पेपर चोरण्यासाठी गेले होते. परंतु त्यांच्या हाती शिक्षिकेचे खूपच खासगी फोटो हाती लागले. ही घटना दक्षिण रशियाच्या रोस्तोव स्कूलमध्ये घडली. शिक्षिका काही काळासाठी आपला लॅपटॉप सोडून क्लासच्या बाहेर गेली होती.
विद्यार्थ्यांना वाटले की आगामी परीक्षेची प्रश्नपत्रिका या लॅपटॉपमध्ये असू शकते. प्रश्न पत्रिका चोरण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना शिक्षिकेचे असे काही फोटो हाती लागले की ज्या वेळी शिक्षिका आपल्या बॉयफ्रेंड सोबत विचित्र अवस्थेत होती.
या फोटोंमध्ये शिक्षिकेने केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेले होते.
हे फोटो विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यामातून शेअर केले. हे फोटो सर्वत्र प्रसारित झाले. या घटनेने शिक्षिका अपमानीत झाली आणि त्यामुळे तीने शाळेत येण्यास नकार दिला. फोटो शेअर करणाऱ्या मुलांचे वय केवळ १५ वर्षे आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.