www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.
चीनमधील यांग्त्जे आणि पीली नदी एकमेकींना जोण्यात येणार आहे. चीनची पाच दशकातील जुनी योजना प्रत्यक्षात आमलात आलेय. या प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आलेय. चीनच्या दक्षिण-उत्तर मार्ग परिवर्तन योजनेच्या कामानुसार यांग्त्जे नदीचे पाणी खालील भागातील पीली नदीच्या खालील भागात झिरपत आहे. यांग्त्जे नदी ही जगातील सर्वात लांब तिसरी नदी आहे. तर याच प्रांतातील पीली नदी दुसऱ्या क्रमांची लांब नदी आहे.
सरकारी वृत्त एन्जसीनुसार २००२मध्ये दक्षिण-उत्तर जल मार्ग परिवर्तन योजना पहिला मार्गाच्या पहिला कामाला सफलता मिळाली आहे. त्यामुळे २०१३च्या तिसऱ्या तिमाहीत पाणी पाठविण्यास सुरूवात होईल. दक्षिणनेतून उत्तर भागात पाण्याचा मार्ग काढण्यात येणार आहे.
यांग्त्जे नदीतून चीनच्या शान्दोंग प्रांतात दातून जलाशयपर्यंत पाणी पोहचण्यासाठी ७२ तास लागतील अशी शक्यता आहे. तर शांदोंगच्या दक्षिण स्थित जियांग्सुच्या यांग्जोऊपासून ७०० किलोमीटर पेक्षा जास्त दूर आहे. यांग्त्जे नदीतून दीड अरब घनमीटर पानी दरवर्षी शांदोंगला पाठविले जाणार आहे. त्यामुळे येथील पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होईल
दक्षिण-उत्तर जलमार्ग परिवर्तन योजना सर्वात आधी चीनी नेता माओ जेदोंग यांनी १९५२मध्ये आखली. आता ५० वर्षांनंतर या योजनेला मूर्तस्वरून मिळाले आहे. २००२मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणण्यास सरकारने मंजुरी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.