‘रेस अॅक्रॉस अमेरिका’... सुमितची रेस सुरु झालीय!

‘रेस अॅक्रॉस अमेरिका’... रॅम म्हणून ओळखली जाणारी जगातील अत्यंत कठिण अशी एक स्पर्धा... या स्पर्धेत प्रत्येक सहभागी सदस्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागताना दिसतो

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 11, 2014, 01:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘रेस अॅक्रॉस अमेरिका’... रॅम म्हणून ओळखली जाणारी जगातील अत्यंत कठिण अशी एक स्पर्धा... या स्पर्धेत प्रत्येक सहभागी सदस्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागताना दिसतो... ‘रॅम’च्या आजवरच्या इतिहासात केवळ 200 जणांनाच ही स्पर्धा पूर्ण करता आलीय... आणि याच आंतरराष्ट्रीय सायकल रेसिंग स्पर्धेत एका मराठमोळा तरुण सहभागी झालाय. सुमित पाटील असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव.
भारतीय वेळेप्रमाणे काल रात्री (मंगळवारी) 12.30 वाजल्याच्या सुमारास ही रेस सुरु झालीय. यावेळी सुमितला प्रोत्साहन देण्यासाठी ओशिअन रोटरी क्लबचे जिम स्कॉर्डरही उपस्थित होते. सुमितला मदत करण्यासाठी ‘टीम अग्नी’ नावानं त्याचे काही सहकारीही त्याच्यासोबत उपस्थित आहेत.
मूळचा अलिबागचा असलेल्या सुमितचं खरं तर स्वप्न आहे भारतीय सैन्यात भरती होण्याचं... जेव्हा जेव्हा तो हे आपलं स्वप्न बोलून दाखवतो तेव्हा तेव्हा या स्वप्नापर्यंत पोहचण्याची त्याची जिद्द आणि मेहनत समोरच्या प्रत्येकालाच भारावून टाकते. पण, एका मराठमोळ्या सामान्य घरातला तरुण परदेशवारी आणि खर्चिक अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची स्वप्न पाहतोय म्हटलं की पहिल्यांदा हे काय भलतंच सुचलं याला? असा साहजिकच प्रश्न इतरांना पडतो... पण, सुमितचा हा भार थोडा हलका झाला तो त्याच्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळे...

काय आहे ‘रॅम’ – RACE ACROSS AMERICA
साध्याच शब्दात सांगायचं झालं तर, जगातलं सर्वात उंच शिखर असलेलं ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची कामगिरी आजवर जवळजवळ 2000 पेक्षा जास्त जणांनी पूर्ण करून दाखवलीय. पण, ‘रॅम’ ही सायकल रेस मात्र जेमतेम 200 जणांनाच पूर्ण करता आलीय. ‘रॅम’मध्ये आजवर केवळ तीन भारतीय या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरलेत... त्यात सुमितचाही समावेश आहे.
10 जून 2014 पासून सुरू होणारी ही स्पर्धा 21 जूनपर्यंत पार पडणार आहे. कॅलिफोर्नियाच्या (वेस्ट कोस्ट) ओशियनपासून सुरु होणारी ही स्पर्धा अॅनापोलिसच्या (ईस्ट कोस्ट) सिटी डॉक इथंपर्यंत प्रत्येक सायकलस्वाराला पोहचायचंय. म्हणजेच, या रेसमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक अमेरिकेतली 12 राज्यं पालथी घालणार आहेत. 3000 मैल म्हणजेच जवळजवळ 4800 किलोमीटरचा रस्ता हे सायकलस्वार केवळ 12 दिवसांत पूर्ण करणार आहेत. म्हणजेच एका दिवशी जवळजवळ 400-450 किलोमीटरचं अंतर प्रत्येक सायकलस्वाराला पार करायचंय.
या स्पर्धेचं वेगळेपण म्हणजे टायमिंग... स्पर्धेदरम्यान प्रत्येक सायकलस्वाराला जेवण, झोप किंवा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची असेल तर ती याच वेळेत... साहजिकच सायकलस्वाराला दोन तासांपेक्षा जास्त वेळ आराम करणं शक्य नाही. प्रत्येक स्पर्धकाची स्वत:शीच असणारी ही स्पर्धा स्पर्धकांना आपल्याच क्षमतेचा साक्षात्कार घडवून देण्यासाठी पुरेशी ठरते.

अधिक माहितीसाठी तुम्ही http://www.raceacrossamerica.org या संकेत स्थळावर जाऊ शकता. तसंच इथं तुम्ही सुमित कुठवर पोहचलाय हे जाणून घेण्यासाठी त्याला ‘ट्रॅक’ही करू शकता.
टीम अग्नी
या संपूर्ण प्रवासात सुमितला हरएक प्रकारे मदत करण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनीच एक टीम बनवलीय. जी प्रत्येक क्षणाला सुमितच्या पाठिशी भरभक्कमपणे उभी राहिलीय. सुमितनं केलेल्या कठिण परिश्रमामुळेच आज प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसतं... सुमितचा अभिमान आणि कौतुक... `टीम अग्नी`मधला प्रत्येक सदस्य आपापली कामं सांभाळून सुमितच्या या स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सज्ज आहे. यातील कुणी पत्रकार आहे, कुणी इंजिनिअर, कुणी कमर्शिअल पायलट, कुणी स्पोर्टस् पर्सन तर कुणी आणखीन काही... पण, या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे... ती म्हणजे सायकलचं वेड...
आशिष आगाशे, अशोक खळे, अश्विन तोंबत, भाविका जैन, चैतन्य वाखळे, दीप्ती शाह, कैलास पाटील, कौशिक अय्यर, लॅविनिया डीसूझा, मेहुल वेद, नेहा खेतन, प्रबोध केनी, सतीश पत्की, शेरेझाद इरानी, त्रिलोक खैरनार, विनीत विकामसे या सदस्यांची टीम सुमितला त्याच्या ध्येय... त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
`रोटरी क्लब`ची सामाजिक बांधिलकी
अशा स्पर्धा म्हणजे सामान्य तरुणांना न परवडणारी गोष्ट... जवळपास 50 लाखांचा खर्च या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी होणार आहे. पण, या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी वरळीच्या `रोटरी क्लब`नं सुमितला मदतीचा हात पुढे केलाय. साम