विद्रोहींनी मलेशियाच्या विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स दिले

मलेशियाचं विमान एमएच 17 चे दोन्ही ब्लॅक बॉक्स विद्रोहींनी परत दिले आहेत. मिसाईल सिस्टमचा वापर करून हे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं होतं. समझोत्या नुसार रात्री हे ब्लॅक बॉक्स मलेशियाला सोपवण्यात आले.

Updated: Jul 22, 2014, 01:57 PM IST
विद्रोहींनी मलेशियाच्या विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स दिले title=

मास्‍को : मलेशियाचं विमान एमएच 17 चे दोन्ही ब्लॅक बॉक्स विद्रोहींनी परत दिले आहेत. मिसाईल सिस्टमचा वापर करून हे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं होतं. समझोत्या नुसार रात्री हे ब्लॅक बॉक्स मलेशियाला सोपवण्यात आले.

या आधी रशिया समर्थक विद्रोही नेत्याने विमान एमएच 17चे दोन ब्लॅक बॉक्स देण्यावर सहमती दर्शवली होती, मलेशियाच्या पंतप्रधानांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नजीब रजान यांनी सांगितलंय की विद्रोही नेते एलेक्झांडर बोरोदई यांनी सहमती दर्शवली आहे. यानुसार स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपासकर्त्यांना त्या जागी जाण्याची परवानगी आहे.

हे विमान बुधवारी क्वालालाम्पूरहून एम्स्टर्डमला जात होतं, आणि पूर्व युक्रेनमध्ये हे विमान मिसाईलच्या सहाय्यानं पाडण्यात आलं, या विमानात 298 प्रवासी होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.