चिलीत ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप, १ ठार १५ जखमी

चिलीला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. या भूकंपामुळे राजधानी सॅंटियोन, चिली आणि फ्रेंच पॉलिनेशिया, तसेच दक्षिण अमेरिकेच्या परिसराला त्सुनामीचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या भूकंपाची तीव्रता ८.३ रिश्टर स्केल इतकी होती.

Reuters | Updated: Sep 17, 2015, 09:01 AM IST
चिलीत ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप, १ ठार १५ जखमी title=

सॅंटियोन : चिलीला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. या भूकंपामुळे राजधानी सॅंटियोन, चिली आणि फ्रेंच पॉलिनेशिया, तसेच दक्षिण अमेरिकेच्या परिसराला त्सुनामीचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या भूकंपाची तीव्रता ८.३ रिश्टर स्केल इतकी होती.

या भूकंपामुळे लोक घाबरून घरातून बाहेर रस्त्यावर आल्याते. तसेच इनेक इमारतींना हादरे बसल्याने मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. भिंत पडल्याने एक महिला मृत्युमुखी पडली तर १५ जण जखमी झाल्याचे रेडिओच्या बातम्यात म्हटले आहे.

चीलीत भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाचा फटका विद्युत यंत्रणेला बसलाय. राजधानीच्या पूर्व  भागात अनेक भागात वीज गायब आहे. तसेच काही ठिकाणी पिण्याचा प्रश्न निर्माण झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.