मोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’?

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादच्या गांधीनगरमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे मोदींना वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देण्यासाठी खास चीनवरुन पाहुणा येणार आहे. 

Updated: Sep 17, 2014, 11:19 AM IST
मोदींना चीनकडून काय मिळणार ‘बर्थ डे गिफ्ट’? title=

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादच्या गांधीनगरमध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे मोदींना वाढदिवसाच्या दिवशी खास भेट देण्यासाठी खास चीनवरुन पाहुणा येणार आहे. 

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग आज भारत दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांचं अहमदाबादमध्ये आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. 

नपिंग यांनी १९९० साली भारताला भेट दिली होती. पण, त्यावेळी ते चीनचे सरकारी उच्चपदस्थ अधिकारी होते. पण राष्ट्रपती या नात्यानं त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. 

जिनपिंग यांचा हा दौरा दोन देशांमधल्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. विशेषत: भारतीय रेल्वे, भारतीय उत्पादनं आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीनकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जातेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीयल पार्कमध्ये गुंतवणुकीचा निर्णय जिनपिंग घेणार आहेत. जपाननं भारतात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर चीन किती गुंतवणूक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एक नजर टाकूया जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमांवर...
१७ सप्टेंबर 
- जिनपिंग यांचं अहमदाबादमध्ये दुपारी २.३० वाजता आगमन
- संध्याकाळी ४ वाजता - मोदींबरोबर जिनपिंग यांची बैठक... या बैठकीत काही करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता
- जिनपिंग साबरमती आश्रमाला भेट देणार
- जिनपिंग यांच्या स्वागतार्थ साबरमती रिव्हर फ्रंटवर भव्य स्नेहभोजन सोहळा
- संध्याकाळी ७.३० वाजता जिनपिंग दिल्लीला जाणार

१८ सप्टेंबर 
सकाळी ७ वाजता - राष्ट्रपतीभवनात जिनपिंग यांच्या सन्मानार्थ भोजन
सकाळी ९.३० वाजता - जिनपिंग राजघाटाचं दर्शन घेणार
सकाळी १० वाजता - जिनपिंग 'ताज पॅलेस'मध्ये सुषमा स्वराज यांच्यासोबत भेट

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.