मोदींची पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट देत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. 

Updated: Dec 25, 2015, 03:12 PM IST
मोदींची पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट! title=

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला 'सरप्राईज' भेट देत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे. 

मोदींचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांचा हा पाकिस्तान दौरा नियोजित नव्हता. आपल्या काबुलच्या नियोजित दौऱ्यात अचानक बदल करत मोदींनी नवी दिल्लीला परतण्याअगोदर पाकिस्तानात उतरण्याचा निर्णय घेतला. 

खुद्द मोदींनीच ट्विट करून ही माहिती दिलीय. पंतप्रधान मोदी काबुलहून परतताना २.३० च्या सुमारास पाकिस्तानात दाखल झालेत. यानंतर ते नवाझ शरीफ यांची भेट घेणार आहेत. अवघ्या दोन तासांत पंतप्रधानांचा हा दौरा आटोपणार आहे. 

पंतप्रधान मोदींनी नवाझ शरीफ यांना ६६ व्या वाढदिवसाला दिलेली ही भेट नक्कीच त्यांच्या स्मरणार राहणार आहे.