सलग दुसऱ्या वर्षी मोदी 'इंटरनेट स्टार'

सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर नरेंद्र मोदी किती चांगला करतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. याची दखल आता टाइम मॅगझिननंही घेतली आहे. 

Updated: Mar 17, 2016, 04:34 PM IST
सलग दुसऱ्या वर्षी मोदी 'इंटरनेट स्टार' title=

न्यूयॉर्क: सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर नरेंद्र मोदी किती चांगला करतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. याची दखल आता टाइम मॅगझिननंही घेतली आहे. 

टाइम मॅगझिननं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'इंटरनेट स्टार' असा केला आहे. राजकारणासाठी सोशल नेटवर्किंगचा मोदींनी प्रभावीपणे वापर केला असं टाइम मॅगझिननं म्हंटलं आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानला भेट देण्याची घोषणा मोदींनी ट्विटरवरून केली होती. याचाही मॅगझिनमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

टाइम मॅगझिननं सलग दुसऱ्या वर्षी मोदींना हा किताब दिला आहे. इंटरनेटवरच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा दावा करणारे डोनॉल्ड ट्रम्प, फूटबॉलपटू ख्रिस्टिआनो रोनाल्डो, किम कार्डिशियन यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर 1.8 कोटी फॉलोअर्स आहेत, तर फेसबूकवर नरेंद्र मोदींच्या पेजला 3.2 कोटी लोकांनी लाईक केलं आहे.