‘पेशावर हल्ल्यामागे मोदी आणि भारताचा हात’, हाफिज सईद बरळला

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद पुन्हा एकदा बरळलाय. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे भारताचा आणि पंतप्रधान मोदींचाच हात असून त्यांचा बदला घ्यायचाय, असं सईद म्हणाला. 

Updated: Dec 17, 2014, 10:15 PM IST
‘पेशावर हल्ल्यामागे मोदी आणि भारताचा हात’, हाफिज सईद बरळला title=

इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद पुन्हा एकदा बरळलाय. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे भारताचा आणि पंतप्रधान मोदींचाच हात असून त्यांचा बदला घ्यायचाय, असं सईद म्हणाला. 

पेशावरवरील हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भारत ‘मगरमछ के आसू रो रहा है’ असाही कांगावा सईदनं केला आहे. भारताला याची किंमत चुकवावी लागेल, असं म्हणत हाफिज सईदनं भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर हाफिजची ही प्रतिक्रिया आलीय. 

ऐका काय बरळलाय हाफिज सईद - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.