जेवण करा पण बिल आपल्या मतानं द्या!

जेवण करा पण बिल देतांना आपल्याला हवं तेवढं द्या... ऐकून नवल वाटेल पण दुबईत 'सेराफिना' नावाचं एक असंच रेस्टॉरंट सुरू झालंय. 

Updated: Feb 10, 2015, 07:21 PM IST
जेवण करा पण बिल आपल्या मतानं द्या! title=

दुबई: जेवण करा पण बिल देतांना आपल्याला हवं तेवढं द्या... ऐकून नवल वाटेल पण दुबईत 'सेराफिना' नावाचं एक असंच रेस्टॉरंट सुरू झालंय. 

या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकानं पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची किंमत काय असेल याचा विचार करून तेवढेच पैसे देऊ शकतो. यासाठी कोणतीही न्यूनतम राशी ठरविण्यात आली नाहीय. हे रेस्टॉरंट दुबईट्या सूक अल बहार इथं सुरू झालंय. याचा सिद्धांत जितके वाटतात तितके पैसे द्या, असाच आहे. 

गल्फ न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, रेस्टॉरंटच्या मॅनेजरने सांगितलं की, आम्हाला काही नवं करायचं होतं, म्हणून आम्ही हा विचार केला. पश्चिमी देशांमध्ये आधीपासूनच अशाप्रकारे हॉटेल्स आहेत. मात्र हे दुबईत पहिल्यांदाच होतंय. सध्या ब्रेकफास्टपर्यंतच ही सेवा पुरवली जाते. 

हे रेस्टॉरंट 'पे व्हॉट यू वॉन्ट' या सिद्धांतावर चालतं. यात हा विश्वास ठेवला जातो की, ग्राहक पण प्रामाणिकपणे पैसे देतील. जर कोणता पदार्थ आवडला नाही तर पैसे दिल्यानंतरही ग्राहकाला वाईट वाटतं. मात्र इथं असं होत नाही. ग्राहक तेवढेच पैसे देतात जेवढे त्यांना योग्य वाटतं. त्यामुळे हे रेस्टॉरंट चांगलंट हीट झालंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.