पॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला, १२ ठार

 दोघा बंदुकधाऱ्यांनी फ्रान्सच्या व्यंग्य पत्रिका शार्ली हेब्डोच्या पॅरिस कार्यालयावर हल्ला केला, यात १२ जण ठार झाल्याची माहिती फ्रान्सच्या मीडियाने दिली आहे. 

Updated: Jan 7, 2015, 09:53 PM IST
पॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला, १२ ठार   title=

 

LIVE UPDATE - पाहा हल्ल्याचा लक्ष विचलित करणारा व्हिडिओ..

 पॅरीस :  दोघा बंदुकधाऱ्यांनी फ्रान्सच्या व्यंग्य पत्रिका शार्ली हेब्डोच्या पॅरिस कार्यालयावर हल्ला केला, यात १२ जण ठार झाल्याची माहिती फ्रान्सच्या मीडियाने दिली आहे. 
 
 यात दहा पत्रकार आणि दोन पोलीस ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदने पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार चार जखमींची तब्येत नाजूक आहे. 

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ऑफिसवर सतत गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी क्लाशनिकोव असॉल्ट रायफल्सने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. 

 

 

ही व्यंग्य पत्रिका बातम्या आणि करंट अफेअर ज्या पद्धतीने देते त्यावरून यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. याचे नुकते एक कार्टुन दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीवर कार्टुन काढले होते. 

एका प्रत्यक्षदर्शी बेनॉयट ब्रिंजर याने फ्रान्स टीव्हीला दिलेल्या माहिती सांगितले की, दोन काळ्या मास्क लावून आले होते. त्यांच्या हातात रायफल घेऊन इमारतीत घुसले. काही मिनिटांनंतर आम्ही गोळीबाराचा आवाज आला. 

यानंतर काही लोकांना आम्ही इमारतीतून बाहेर येताना पाहिले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.