पाकिस्तानची भारतावर चीनी कॅमेऱ्यातून नजर

एकीकडे भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र राजस्थानला जोडलेल्या भारतीय सिमेवर पाकिस्तानने चीनी कॅमरे लावून हेरगिरी करत आहेत.

Updated: Jul 11, 2015, 06:30 PM IST
पाकिस्तानची भारतावर चीनी कॅमेऱ्यातून नजर title=

लाहोर : एकीकडे भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र राजस्थानला जोडलेल्या भारतीय सिमेवर पाकिस्तानने चीनी कॅमरे लावून हेरगिरी करत आहेत.

 बीएसएफने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात, या बातमीबद्दल चिंता व्यक्त केली असून यावर हरकत घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेच्या ५०० मीटर अंतरावर कॅमरासारखी काही वस्तू लावणे बेकायदेशीर आहे. या कायद्याचे उल्लंघन करून पाकिस्तानने २०० ते ३०० मीटरच्या अंतरावर हे हाय इंटेंसिटी असणारे चीनी कॅमरे लावले आहेत.
 
बीएसएफच्या मतानुसार बारमेर आणि जैसलमेरमध्ये पाकिस्तानने कॅमरे लावले आहेत तर बिकानेर आणि श्रीगंगानरमध्ये कॅमरे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पाकिस्तान प्रत्येकी दोन किलोमीटरवर १५ फूट उंचीचे खांब उभे करत आहे. ज्यावर हाय इंटेंसिटी असणारे चीनी कॅमरे बसविव्यात येत आहेत.
 
शिवाय या कॅमऱ्यांची बॅटरी संपू नये म्हणून सोलर पॅनेल लावत आहेत. हे कॅमरे भारतीय सिमेवरील चौकीच्या अगदी समोर बसवलेले आहेत. पाकिस्तान यातून भारतावर हेरगिरी करेल, अशी शंका भारताने व्यक्त केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.