नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत अफगाणिस्तानने दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवलं आहे. अफगाणिस्तानने महासभेला संबोधित करतांना म्हटलं की, जगाला माहित आहे की, पाकिस्तान हे दहशतवादाचं हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानला अनेकदा सूचना दिल्या गेल्या आहेत की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा पण पाकिस्तानने आजपर्यंत तालिबानी दहशतवाद्यांविरोधात देखील कारवाई नाही केली.
भारताने जगभरातील देशांपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे की पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवावं. भारताच्या या मागणीला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानला या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं खच्चीकरण करण्याचा पंतप्रधान मोदींची योजना यशस्वी होतांना दिसत आहे. पाकिस्तान हे सध्या निशान्यावर असं देखील त्यांनी म्हटलं आहे.