नवी दिल्ली : भारतानंतर सार्कमधील आणखी एक देश असलेल्या श्रीलंकेनंही पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय.
इस्लामाबादमध्ये आयोजित १९ व्या शिखर संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय श्रीलंकेनं जाहीर केलाय.
आठ देशांच्या समूहात हा निर्णय घेणारा श्रीलंका पाचवा देश बनलाय. याअगोदर भारतसहीत बांग्लादेश, भूटान आणि अफगानिस्तानं संमेलनात सहभागी होण्यास नकार दिलाय. 'सार्क'मध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूटान आणि अफगानिस्तान या आठ देशांचा समावेश आहे.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देणारं राष्ट्र म्हणून बहिष्कार टाकत या संमेलनात सहभागी होण्यास नकार दिला होता.
सार्कच्या नियमांनुसार जर एकाही देशानं स्वत:ला वेगळं केलं तर सार्क शिखर संमेलन स्थगित करावं लागतं किंवा पुढे ढकलावं लागतं.