पाकिस्तानने सीमेवर लावल्या तोफा आणि अँटी एयरक्राफ्ट गन

पाकिस्तानच्या सेनेने सीमेवर अँटी एयरक्राफ्ट गन आणि तोफ लावल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर भारतीय लष्कराचे जवान देखील सावध झाले आहेत. हल्ला झाला तर त्याला प्रत्यू्त्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे.

Updated: Oct 29, 2016, 04:24 PM IST
पाकिस्तानने सीमेवर लावल्या तोफा आणि अँटी एयरक्राफ्ट गन title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सेनेने सीमेवर अँटी एयरक्राफ्ट गन आणि तोफ लावल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर भारतीय लष्कराचे जवान देखील सावध झाले आहेत. हल्ला झाला तर त्याला प्रत्यू्त्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे.

मागील 6 दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये सीमाभागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. भारतीय जवान पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत आहेत. पाकिस्तानचे १५ जवान यामध्ये मारले गेले आहेत.

पाकिस्तानचं सैन्याची सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून किंवा दहशतवाद्यांकडून काही हल्ले होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि हल्ले होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सीमाभागातल्या गावांमध्ये यामुळे दहशतीचं वातावरण आहे. पाकिस्तानमधील अनेक गावांना देखील नुकसान झाल्याचं समोर येत आहे.