www.24taas.com, झी मीडिया, बिजींग
चीनमध्ये एका महिलेने मांजरीला ठार करून तिचा सूप बनवला आणि त्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांना जबरदस्त विरोध केला. नागरिकांचा विरोध पाहता महिलेने विचलित करणारे फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न केला, पण इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले होते.
ली जीबँग या महिलेने सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या मित्रांना मांजर मारून त्याचा सूप केल्याचे फोटो पाठविले. हे फोटो खूप विचलित करणारी होती. फोटो पोस्ट केल्यानंतर थोड्याच वेळात नागरिकांनी या विकृत घटनेचा निषेध करण्यास सुरूवात केली.
या महिलेने सोशल नेटवर्किंग साइटवर लिहिले, पाहा, मी वाघ पकडला आणि त्याला खाल्ले. त्यानंतर तिने मांजरीचे फोटो, त्याचा सूप बनविण्याचे विधी, मांजरीला सोलण्याचे आणि तुकडे करण्याचे फोटोसुद्धा शेअर करून टाकले. एक फोटो तिने मांजर कापण्यापूर्वीचे टाकले आहे. ती बिचारी मांजर एका पिंजऱ्यात कैद होती.
या फोटोमध्ये दाखविण्यात आले की, सूप बनविताना या महिलेने फर कोट आणि चश्मा घातला होता. मांजरीचे सूपने महिलेला तेव्हा अडचणीत आणले जेव्हा तीला नागरिकांचा रागाचे इमेल सुरू झाले. लोकांना वाईट प्रतिक्रिया टाकल्या. आपला बचाव करताना महिला म्हणाली, ती मांजर आजारी होती. ती एका अपघातात जखमी झाली होती. तिची हत्या ही वैध आहे. मी मांजरीसह काही अवैध केले नाही, मी तिला कापले आणि खाऊन टाकले.
चीनमध्ये अधिकृतरित्या मांजर खाण्याला विरोध आहे. परंतु, प्रत्येक वर्षी ४० लाख मांजरी मारून खाल्ले जाते. प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत आहे.
२०१२ या वर्षात अधिकाऱ्यांना मांजरी आणि कुत्र्यांना अवैध रित्या मारून खाण्याविरोधात एक कायदा बनविण्यात आला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा आहे. तसेच असे करणाऱ्याला मोठा दंडही आकारला जातो आहे. असे असले तरी अनेक रेस्टॉरंटमध्ये असे व्यंजन खाण्यास मिळतात.
चीन मधील गाँगडाँग आणि गाँगसी प्रांतात मांजरीचा मांस हिवाळ्यात चांगले व्यंजन मानले जाते. त्याने हे शरीर गर्म राहते. हे व्यंजन बनविणाऱ्या काही शेफच्या मते ते स्वास्थ्यासाठी चांगले असते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.