दुर्घटनाग्रस्त बेपत्ता मलेशियन विमानाचा मलबा शोधण्याची मोहिम ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी पुन्हा सुरु केलीय. ऑस्ट्रेलियन नौका सुरक्षा प्राधिकरणाद्वारे चालू असलेली ही मोहिम जोरदार पाऊस, उसळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यामुळे बंद करण्यात आली होती.
`बेपत्ता मलेशियन विमानचा शोधमोहिमेसाठी जास्त वेळ घेणार नाही. मात्र एमएच-३७० विमानचा मलबा शोधण्यात अपयशी होणार नाही` असे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबोट यांनी स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी सांगितलंय की, `खराब वातावरणामुळं २४ तास तपास करणे शक्य नव्हतं. मात्र त्या क्षेत्रात थोडाफार मलबा आहे आणि ऑस्ट्रेलियाचे काम शेवटच्या आशेपर्यंत सुरु असेल.
`त्या विमानचे गूढ शोधण्याचे आम्ही प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. त्यासाठी १२ विमानं आणि अनेक जहाज शोधमोहिमेसाठी वापरली जाण्याची शक्यता आहे`. सध्यातरी शोधमोहिमेत ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरिका, जपान, चीन आणि दक्षिण कोरिया असे सहा देश मदत करणार आहेत असे, ऍबोट यांनी सांगितलंय.
विमानाद्वारा पाठवलेल्या उपग्रहांच्या संकेतानुसार विमान दक्षिण हिंद महासागरात पडल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढलाय. ८ मार्चला बेपत्ता झालेले विमान शोधण्यासाठी २० पेक्षा अधिक देशांतील विमानं आणि जहाजं कार्यरत होती. या विमानात ५ भारतीयांसोबत एकूण २३९ प्रवासी आणि एक भारतीय वंशाचा कॅनडियन प्रवासी होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.