रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज

रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला. 

Updated: Aug 6, 2016, 11:50 PM IST
रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला. 

रॉयटर्स ही माहिती दिली. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, या स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाही. 

परंतु, या घटनेमुळे रिओची सुरक्षा वाढवण्यात आलीय. बॉम्ब स्कॉड आणि पोलीस घटनास्थळावर दाखल झालेत. पोलिसांनी संपूर्ण भागाला घेराव घातलाय. सेनेनं हा सगळा भाग तातडीनं रिकामा केलाय. 

रायटर्सच्या माहितीनुसार, अजूनही या स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही.