www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीवर खुश झाले आहेत. लोकशाही मार्गाने पाकिस्तानात नवे सरकार निवडून आल्याबद्दल ओबामांनी आनंद व्यक्त केला असून नव्या सरकारशी अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करता येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकांच्या काळात दहशतवादी संघटनांकडून धमक्या येऊनही अत्यंत शांततेने पाकिस्तानातील निवडणूक पार पडली, याबद्दल ओबामांनी पाकिस्तानचे अभिनंदन केलं आहे. “पाकिस्तानी निवडणुकांनंतर आलेलं नवं सरकार पाकिस्तानी जनतेला स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध भविष्य देईल आणि त्यासाठी अमेरिका नेहमीच पाकिस्तानला साथ देईल”, अशा आशयाचं एक पत्र ओबामांच्या कार्यालयातून सादर करण्यात आलं आहे.
मुस्लिम लीगचे नवाज शरीफ यांना बहुमत मिळालं असून पीपीपी पार्टीला यावेळी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मात्र इमरान खान यांच्या पार्टीला यावेळी बऱ्यापैकी यश मिळालं आहे. चारपैकी तीन जागांवर इमरान खान यांना यश मिळालं आहे. मात्र लाहोरमध्ये इमरान खान यांना पराभवाला सामेरं जावं लागलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.