www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा भेटीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. मोदी अमेरिका दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित असले, तरी या दौऱ्याचे नियोजन झालेले नाही, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारी हार्फ सांगितले.
मोदी यांच्या वेळापत्रकाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्र सचिव जॉन केरी यांच्याशी चर्चा झाली आहे. अजून तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींना व्हिसा देण्यास नकार देणाऱ्या अमेरिकेने त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अमेरिका दौऱ्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिका दौऱ्यावर जाण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. आता तर अमेरिकेकडून स्पष्टीकरण आल्याने दौऱ्याबाबत अधिक स्पष्टता होऊ शकलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.