`अल्ला` शब्द मुस्लिमांखेरीज कुणी वापरायचा नाही!

‘अल्ला’ हा शब्द मुस्लिमांखेरीज अन्य कुणी वापरू नये, असा निकाल मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे. २००९ मधील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येथील हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला शब्द वापरण्यास परवानगी देण्यात आली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 14, 2013, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, क्वालालंपूर
‘अल्ला’ हा शब्द मुस्लिमांखेरीज अन्य कुणी वापरू नये, असा निकाल मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे. २००९ मधील स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार येथील हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला शब्द वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आज तीन मुस्लीम न्यायाधीश असलेल्या या न्यायालयात हा निर्णय फिरवण्यात आला.
"अल्ला हा शब्द ख्रिश्चसन धर्मीयांच्या संस्कृतीचा भाग नसल्याने या शब्दाच्या वापराने या समुदायामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्ययता आहे,`` असे मुख्य न्यायाधीश मोहम्मद अपांडी अली यांनी सांगितले. मलेशियामध्ये गेल्या मे महिन्यात झालेल्या तणावपूर्ण निवडणूकांच्या पार्श्विभूमीवर हा निर्णय आला आहे. मलेशियातील नजीब रझाक यांच्या सरकारमध्ये स्थानिक संयुक्त मलय राष्ट्रीय संघटनेचा वरचष्मा आहे. येथील स्थानिक मलय हे कायद्याने मुस्लीम आहेत. रझाक यांच्या सरकारने अल्ला हा शब्द मुस्लीमांसाठीच असल्याची भूमिका घेत येथील स्थानिक ख्रिश्चिन वर्तमानपत्राने तो वापरू नये, असा आदेश दिला होता. सरकारच्या या भूमिकेस न्यायालयाचाही पाठिंबा मिळाला आहे. न्यायालयाबाहेर असलेल्या सुमारे 200 जणांच्या मुस्लीम जमावाने अल्ला हू अकबर च्या घोषणा देत या निर्णयाचे स्वागत केले.
या वर्तमानपत्राच्या वकिलांनी मलय ख्रिश्चलन हा शब्द अनेक शतकांपासून वापरत असल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने अल्ला शब्द केवळ मुस्लीमांसाठी असल्याची भूमिका घेतली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.