www.24taas.com, झी मीडिया, रियाध
सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय. सौदीमध्ये जवळजवळ २० लाख भारतीय काम करतात.
आत्तापर्यंत जवळजवळ ६० लाख स्थलांतरीत भारतीयांनी मायदेशी परतण्यासाठी इमर्जन्सी सर्टिफिकेटच्या माध्यमातून परतण्याची मागणी केलीय. याच मुद्यावर लक्ष केंद्रीत करून आज परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. गेल्या पाच वर्षातील भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची ही पहिलीच सौदीवारी आहे.
सौदी अरेबियातील नवीन निताकत कामगार कायद्यानुसार सौदी अरेबियातील सगळ्या कंपन्यांनी देशाबाहेरील प्रत्येक १० कर्मचाऱ्यामागे एका सौदी अरब असलेल्या व्यक्तिला नोकरी देणे बंधनकारक आहे. यामुळे इतर देशांतून सौदी अरेबियात नोकरीसाठी गेलेल्या नागरिकांत मात्र चिंतेचं वातावरण आहे. भारतीय नागरिकांना या परिस्थितीत मदत करण्यासाठी भारतीय दुतावासानं ‘आपत्कालिन स्थिती’ म्हणून २७ हजार कर्मचाऱ्यांना भारतात परतण्यासाठी इमर्जन्सी सर्टिफिकेट देणार असल्याचं म्हटलंय. ज्या ज्या भारतीय कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आहे त्या सगळ्यांना असे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.