www.24taas.com, झी मीडिया, काठमांडू
नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करावं, यासाठी नेपाळमध्ये एका राजेशाही दलाने आंदोलन उभे केले आहे. जुनी राजेशाही पुन्हा आमलात आणावी, यासाठी मागणी वाढत आहे.
राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी नेपाळचे अध्यक्ष कमल थापा यांनी राजेशाही असणारी लोकशाही आणि एक हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची शपथ या प्रसंगी घेण्यात आली. या कार्यासाठी या वर्षी २१ ते २८ ऑक्टोबर या काळात देशव्यापी स्वाक्षरी अभियान चालवण्यात येणार आहे. त्याद्वारे पुन्हा नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
२००८ साली झालेल्या बंडानंतर नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली होती. तसंच नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.