नेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये!

वर्णद्वेष विरोधी आंदोलनाचे नेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना फुप्फुसांच्या विकारामुळे आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंडेलांचं वय ९४ वर्षं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2013, 06:47 PM IST

www.24taas.com, केप टाऊन
वर्णद्वेष विरोधी आंदोलनाचे नेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना फुप्फुसांच्या विकारामुळे आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंडेलांचं वय ९४ वर्षं आहे.
मंडेलांना इस्पितळात दाखल केल्याची बातमी राष्ट्रपती कार्यालयाने जनतेला दिली. तसंच मंडेलांसाठी प्रार्थना करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास मंडेलांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं.गेल्या चार महिन्यांत तिसऱ्यांदा मंडेलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी फुप्फुसांच्या विकारामुळे त्यांना १८ दिवस हॉस्पिटलमध्ये भर्ती व्हावं लागलं होतं. या महिन्यातच त्यांना प्रिटोरिया हॉस्पिटलमध्ये एक रात्र ठेवण्यात आलं होतं.