'नवाज' अजूनही नाही शिकले 'शराफत', बुरहानला म्हटलं हिरो

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अजूनही बुरहान वाणी हा दहशतवादी होता हे मान्य करायला तयार नाही आहेत. बुरहान वाणी हा दहशतवादी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. बुरहान वाणी कश्मीरची शान होता. तो युवा कश्मीरी नेता होता. त्याचं बलिदान व्यर्थ नाही जाणार असं शरीफ यांनी म्हटलंय.

Updated: Oct 10, 2016, 06:01 PM IST
'नवाज' अजूनही नाही शिकले 'शराफत', बुरहानला म्हटलं हिरो title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अजूनही बुरहान वाणी हा दहशतवादी होता हे मान्य करायला तयार नाही आहेत. बुरहान वाणी हा दहशतवादी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. बुरहान वाणी कश्मीरची शान होता. तो युवा कश्मीरी नेता होता. त्याचं बलिदान व्यर्थ नाही जाणार असं शरीफ यांनी म्हटलंय.

नवाज यांनी त्यांचा पक्ष पीएमएलएनच्या बैठकीत कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलणार असल्याचं म्हटलं आहे. असं करण्यास आम्हाला कोणीच रोखू शकणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली.