नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 28, 2015, 10:20 PM IST
नासाचा इशारा, समुद्रा बुडणार मुंबई आणि न्यू यॉर्क  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिलेला इशारा ऐकून तु्म्ही घाबरून जाल. जगात समुद्र किनारी असणारे शहरं, बुडण्याचा धोका आहे. समुद्राची उंची तीन फुटांनी वाढणार असल्याने मुंबई, न्यू यॉर्क, टोकिओसारखे शहरं या शतकाच्या शेवटपर्यंत बुडून जाण्याची शक्यता आहे. 

जगातील १५ मोठे शहरांपैकी ११ शहर समुद्र किनाऱ्यावर आहेत. गुरूवारी नासाकडून एक इन्फोग्राफिक प्रसिद्ध केले आहे. या इन्फोग्राफिकमध्ये नासाने सांगितले की, समुद्रातील तापमान वाढल्याने समुद्रातील पाण्याचे स्तर तीन फुटांपर्यंत वाढू शकतो. 

२० व्या शतकाच्या सुरूवातीला समुद्राचा स्तर आठ इंचापर्यंत वाढला होता. नासाच्या मते मनुष्याकडून वातावरणात सोडण्यात आलेल्या ग्रीन हाऊस गॅसेसचा ९० टक्के भाग हा समुद्रात जात आहेत. 

या कारणामुळे वातावरणात बदल झाले आहेत आणि पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. नासाने दिलेल्या इशाऱ्यानुसार समुद्राचा स्तर वाढला तर सुरूवातील पाणी कमी 
उंचीच्या भागात घुसणार आहे. त्यानंतर समुद्रातील वादळ आणि उंच समु्द्रातून पाणी उंच भागात पोहचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.