झोपून राहण्याचे 'नासा' देतयं ११ लाख रूपये!

तुम्ही रोज कामाला जाता काम करता, तेव्हा कुठे तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. पण तुम्हाला काम न करता फक्त झोपण्याचे ११ लाख रूपये दिले तर...!

Updated: Apr 15, 2015, 12:30 PM IST
झोपून राहण्याचे 'नासा' देतयं ११ लाख रूपये! title=

वॉशिंग्टन : तुम्ही रोज कामाला जाता काम करता, तेव्हा कुठे तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. पण तुम्हाला काम न करता फक्त झोपण्याचे ११ लाख रूपये दिले तर...!

हो...ही ऑफर अमेरिकेच्या 'नासा' (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेकडून देण्यात येत आहे. ७० दिवस बेड रेस्ट करण्याचे १८ हजार डॉलर म्हणजे ११.२५ लाख रूपये नासा देत आहे.

नासा मायक्रोग्रॅव्हिटीवर बराच काळ राहिल्यावर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास करून संशोधन करत आहे. ज्याला 'बेड रेस्ट' असे नाव देण्यात आले आहे. त्या अंतर्गत, यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीस ७० दिवस बेडवर झोपून काढावे लागणार आहे.    

या अभ्यास कार्यक्रमात त्या व्यक्तीस पूर्ण वेळ भूपृष्ठाला समांतर या स्थितीत रहावं लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.