मुुंबई : एक जंगल होतं... या जंगलात अनेक हिंस्त्र श्वापदं होती... आपण लहानपणी ऐकलेल्या इसापनीतीतल्या अनेक गोष्टींची सुरूवात अशीच... आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, अशाच एका जंगलातली गोष्ट... ही कहाणी आहे एका बाळाची आणि त्याच्या दत्तक आईची...
बिबट्याच्या या मादीनं एका माकडिणीला ठार केलंय... आपली शिकार खेचून नेताना बिबट्याच्या लक्षात आलंय की ही माकडीण नुकतीच बाळंत झालीये...
तिच्या कुशीतून हे चिमुकलं पिल्लू बाहेर येतं... नुकत्याच उघडलेल्या त्याच्या डोळ्यांना पहिलं दर्शन होतं ते आपल्या आईच्या शिकाऱ्याचं...
आता बिबट्याची ही मादी काय करणार? या चिमुकल्याचाही घास घेणार का? असे प्रश्न हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना होईल.
पण अचानक...
या चिमुकल्या माकडाला बघून बिबट्याच्या मादीमधलं मातृत्व जागं होतं... आपल्या पिल्लांना खेळवावं तसंच ती या पिल्लाला खेळवतेय...
केवळ इतकंच नाही... शिकारीच्या शोधात तिथं एक तरस येतो तेव्हा बिबट्याची ही मादी आधी माकडाच्या पिल्लाला सुरक्षित जागी नेते... तिला आपली शिकार चोरली जाण्याची भीती नाही, तिला काळजी आहे या पिल्लाची...
माकडाच्या या पिल्लाला जन्मतःच अनाथ करणाऱ्या बिबट्याच्या मादीनंच आता तिचं मातृत्व पत्करलंय... माणसं रानटी वागू लागली असताना हिंस्त्र श्वापदांमध्ये दिसलेली ही माणूसकी थक्क करणारी आहे..
पाहा हा हेलावणारा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.