२०१६ चीनला भारतात येण्याचं वर्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी

शांघाईच्या वर्ल्ड एक्सपो अॅन्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ५५०० भारतीयांसमोर 'मेक इन इंडिया'चा नारा दिलाय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2015, 02:56 PM IST
२०१६ चीनला भारतात येण्याचं वर्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी title=

शांघाय : शांघाईच्या वर्ल्ड एक्सपो अॅन्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास ५५०० भारतीयांसमोर 'मेक इन इंडिया'चा नारा दिलाय. 

पाहा, काय म्हणतायत मोदी...

  • एवढा मोठा कार्यक्रम केल्याबद्दल, इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद

  • भारत - चीन मिळून जन कल्याण करू - नरेंद्र मोदी

  • २०१६ चीनला भारतात येण्याचं वर्ष आहे... तुम्ही जास्तीत जास्त चिनी लोकांना भारतात घेऊन या... 

  • पण, माझा विकासावर विश्वास आहे  

  • लाल किल्यावरून टॉयलेटची गरज मांडली तर त्यावर टीका झाली

  • जशी आमची स्वप्न आहेत... तसंच आमचे पाय जमिनीवरच आहे

  • चीनही एका रात्रीच बदललेला नाही... ३० वर्षानंतर चीनला हे शक्य झालंय  

  • जगातील सर्वात वेगानं पुढे वाटचाल करणारा देश म्हणून आता भारत जगभर ओळखला जातोय... सगळ्या रेटिंग एजन्सीजचंही हेच म्हणणं आहे.

  • आपणचं आपल्या देशाबद्दल सन्मान वाढवायला हवा 

  • ज्या मुलाला त्याची आईच इतर लोकांसमोर झाडते तेव्हा त्याला इतर मुलं स्विकार करतील का? नाही... तसंच देशाचं आहे... 

  • राजकीय गोष्टी वेगळ्या आहेत परंतु, व्यक्ती आणि व्यक्तीमधलं नातं वेगळं असतं... ते नातं वृद्धिंगत व्हायला हवं... आणि मी याचं महत्त्व ओळखतो

  • चीन आणि भारताच्या नागरिकांनी एकमेकांना ओळखणं गरजेच

  • जेवढे चीनी नागरिक भारतात राहतात त्याहून कित्येक भारतीय लोक चीनमध्ये राहतात 

  • भारताच्या नागरिकांनी चीनला समजावं, चीनच्या नागरिकांनी भारताला समजावं, ही वेळेची गरज आहे

  • शियान शहराशी माझं एक वेगळंच नातं आहे... शियान माझ्यासाठी माझं गावंच आहे...  - नरेंद्र मोदी

  • ह्युएत त्संग भारतात आले होते... असं इतिहासात आपण वाचलंय... तेव्हा ते माझ्याही गावात आले होते, असं मी वाचलं होतं... ह्युएत त्संगनं जे लिहिलेलं त्यानुसार माझ्या गावात खोदकाम झालं... आणि त्यांनी म्हटल्यानुसार अनेक ऐतिहासिक ऐवज तिथं सापडला. विजयानंतर शी जिनपिंग यांनी फोन केल्यानंतर त्यांनी याची आठवण काढली... जिनपिंग यांनी माझ्यावर बराच अभ्यास करून ठेवला होता. माझ्या गावातून पुन्हा चीनमध्ये दाखल झाल्यानंतर ह्युएत त्संग जिनपिंग यांच्या गावात गेले होते, असंही त्यांनी मला सांगितलं... 

  • चीनच्या विद्यार्थ्यांची भारताबद्दलची धारणा बदलणं गरजेचं आहे

  • चीनच्या तरुणांमध्ये भारताबद्दल खूप जिज्ञासा आहे 

  • चीनमध्ये तीन दिवसांच्या कार्यक्रमात दोन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तरुणांशी संवाद साधणं हा अद्भूत अनुभव होता

  • इतक्या वर्षांत भारतीयांचा सरकारवर भरवसा नव्हता म्हणून जगाचा भारतावर विश्वास नव्हता... पण, बहुमताच्या सरकारवर जगाचा विश्वास

  • जगभरातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे कारण, तब्बल ३० वर्षानंतर पहिल्यांदाच भारतात बहुमताच्या जोरावर सरकार निवडून आलंय

  • पण, जास्त काम करणं हा गुन्हा आहे... हे पाप आहे तर सव्वाशे करोड लोकांसाठी मी करायला तयार आहे

  • मी एवढा दुर्भाग्यशाली आहे की, मी जास्त काम केलं तरी माझ्यावर टीका होतेय..

  • पण, आपण आपल्यालाच विसरलोय

  • आपल्या पूर्वजांनी जगाला कुटुंब मानण्याची शिकवण दिलीय

  • ग्लोबल वॉर्मिंग मोठी मानवानं निर्माण केलेली सर्वात मोठी समस्या

  • जगाला देण्यासाठी आपल्याकडे खूप काही आहे 

  • चीन आणि भारत मिळून जगाला एक नवी आशा, उत्साह देण्यासाठी बांधिल आहेत... आणि भारत यासाठी संपूर्ण तयारी करतोय

  • विकसनशील देशाचा अगोदर कुणी एवढ्या गंभीरतेनं विचार केला नव्हता

  • चीन आणि भारत मिळून केवळ त्यांच्या समस्येवर तोडगा शोधू शकतातच शिवाय ते जगभराला विकासाचा मार्ग दाखवू शकतील

  • सर्व प्रोटोकॉल तोडत भेटण्यासाठी दाखल झालेल्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे मानले आभार... 'हे स्वागत माझं नव्हतं, सव्वाशे करोड भारतीयांचं होतं'

  • रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मंगोलिया आपलं सत्र बोलावेन आणि भारताच्या पंतप्रधानाला बोलावेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती... आता वेळ बदलतेय.

  • आज मी मंगोलियाला निघणार आहे... तुम्ही रविवार साजरा करा... मी मंगोलियाला काम करेन

  • तीन दिवसांच्या दौऱ्यातला चीनमधला हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे

  • तुमचे आशिर्वाद माझ्यासाठी खूप मोठी ताकद

  • भारताच्या यशासाठी आम्ही जे पाऊल पुढे टाकलेत ते यशस्वी व्हावेत यासाठी, तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या

  • आज शांघायमध्ये माझ्यासमोर लघु हिंदुस्थान आहे... भारताचा प्रत्येक कोपरा इथं उपस्थित आहे 

  • गेल्या वर्षभरात कुणाही आमच्यावर आरोप केलेला नाही की चुकीच्या भावनेनं कोणतंही पाऊल उचललंय... 

  • अनुभवहिनतेच्या कारणास्तव कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते... पण, चुकीच्या भावनेनं कोणतंही काम करणार नाही

  • प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचं काम करतो

  • मी माझं काम खूप इमानदारीनं करतोय 

  • मला कुणीही पसंत करत नव्हतं...  

  • माझ्या बायोडाटामध्ये पंतप्रधान पदासारखं काहीही नव्हतं... 

  • माझा बायोडाटा पाहून कुणी मला पंतप्रधान पदावर बसवेल का?

  • एक वर्षापूर्वी याच दिवशी... एकच स्वर ऐकू येत होता... दुखभरे दिन बिते रे भैय्या... 

  • वेळ किती विगानं बदलतोय - नरेंद्र मोदी

  • चीनमध्ये भारतीय प्रेमानं राहत आहेत 

  • चीनमध्ये 'मेक इन इंडिया'चा नारा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.