बीजिंग : सध्या चीनमध्ये चर्चा रंगलीय ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सेल्फी डिप्लोमसीची...
पंतप्रधान मोदींनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची शुक्रवारी भेट घेतली, तसंच त्यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. मात्र ही भेट गाजली ती मोदींनी चिनी पंतप्रधान ली कियांग यांच्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळं...
पंतप्रधान मोदी केवळ सेल्फी काढून थांबले नाहीत, तर त्यांनी ट्विटरवर तसंच चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या वुईबो या सोशल नेटवर्किंग साइटवर ही सेल्फी अपलोड केली.
It's selfie time! Thanks Premier Li. pic.twitter.com/DSCTszSnq3
— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2015
चिनी राजकारणी सोशल मीडियावर तितकेसे एक्टिव्ह नाहीत. त्यामुळं चिनी नागरिकांसाठी हा मोठाच धक्का होता.
मोदींच्या या सेल्फीवर अनेकांनी 'क्यूट प्रीमीअर' अशा आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आमचे पंतप्रधान ली वुईबोवर कधी सक्रीय होणार? म्हणजे त्यांच्याशी आम्हाला थेट संवाद साधता येईल, अशी प्रतिक्रियाही एका नागरिकानं व्यक्त केली. मोदींच्या या सेल्फी प्रेमाची भुरळ चिनी नागरिकांनाही पडल्याचं स्पष्टपणे जाणवलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.