केनियातील थरार- ३ भारतीयांसह ६८ जणांचा बळी!

नैरोबीच्या मॉलमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे. अतिरेकी अजूनही मॉलच्या आत लपले आहेत. त्यांना मारण्यासाठी आज सकाळी पुन्हा एकदा जोरदार चकमक झाली. हेवी गनफायरींगचे आवाज मॉलच्या आतून ऐकायला आल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीनं सांगितलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 23, 2013, 12:02 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नैरोबी
नैरोबीच्या मॉलमध्ये अजूनही चकमक सुरूच आहे. अतिरेकी अजूनही मॉलच्या आत लपले आहेत. त्यांना मारण्यासाठी आज सकाळी पुन्हा एकदा जोरदार चकमक झाली. हेवी गनफायरींगचे आवाज मॉलच्या आतून ऐकायला आल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीनं सांगितलंय.
या हल्ल्यात आत्तापर्यंत ६८ जणांचा बळी गेलाय. तर जवळपास २०० जणं जखमी झालेत. अतिरेक्यांना मॉलच्या आत घेरण्यात आल्याचं केनियाच्या आर्मीनं म्हटलंय.
केनियाच्या शेबाब बंडखोरांनी हा हल्ला केल्याचं मान्य केलंय. केनियाच्या आर्मीनं सोमालियात केलेल्या हस्तक्षेपामुळं हा हल्ला केल्याचं शेबाब या गटानं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.