केनियाची राजधानी नैरोबीत मॉलवर हल्ला, ३९ ठार

केनियाची राजधानी नैरोबीमधील वेस्टगेट मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केलाय. हल्ल्याच्यावेळी हल्लेखोरांनी ग्रॅनाईड फेकल्याची माहितीही उघड झालीये. या हल्ल्यात 39 जण ठार झाल्याची माहिती केनियातील रेडक्रॉसचे अधिकारी अब्बास गुलेत यांनी दिली आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 22, 2013, 08:38 AM IST

www.24taas.com , झी मीडिया,नैरोबी
केनियाची राजधानी नैरोबीमधील वेस्टगेट मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केलाय. हल्ल्याच्यावेळी हल्लेखोरांनी ग्रॅनाईड फेकल्याची माहितीही उघड झालीये. या हल्ल्यात 39 जण ठार झाल्याची माहिती केनियातील रेडक्रॉसचे अधिकारी अब्बास गुलेत यांनी दिली आहे.
मृतांमध्ये दोन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सोमालियातील एका अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय.
जेव्हा मॉलवर हल्ला झाला तेव्हा तिथं जवळपास एक हजार लोक उपस्थित होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३९ जणांचा हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यात हॉस्पिटलमध्ये दगावल्यांचाही समावेश आहे. मात्र पोलिसांनी वेळीच पोहोचून अनेक लोकांना मॉलमधून बाहेर काढलं आणि हल्लेखोरांना चारही बाजूंनी घेरलं. एका हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.