लंडन : इंग्रजी परीक्षेत पास न झाल्यास अशा मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी म्हटलं आहे. या देशात राहायचंय तर इंग्रजी आलंच पाहिजे असं स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलं आहे.
हा निर्णय कटोर असला तरी इंग्रजी आलं तर अनेक संधी तयार होतात असंही त्यांनी म्हटलं आहे.
इंग्लंडमध्ये जवळपास १,९०,०० मुस्लिम महिलांना इंग्रजी येत नाही. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलांची इंग्रजी शिकणे ही जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
इंग्रजी येत नसेल तर त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात येईल असं त्यांनी शेवटी म्हटलं. त्यामुळे इंग्लंड राहणाऱ्या मुस्लिम महिलांना अडचणी सहन कराव्या लागणार आहेत.