मुंबई : अंतराळ तंत्रज्ञानानं नवी उंची गाठलीय. अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमलंय. मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते. त्यात शनिवारी यश आलं.
झिनिया असं या फुलाचं नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच अंतराळातल्या कमी तापमानामुळे शास्त्रज्ञांची सगळी मेहनत वाया गेली होती. पण धीर न सो़डता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्यामुळे त्यांना हे महत्त्वाचं यश संपादन करता आलं.
याआधीही अशा प्रकारचे रोपटे बनवण्यात आली होती. पण फुलाचे हे पहिलेच रोपटे आहे. अंतराळात टोमॅटोची शेती शास्त्रज्ञ आता प्रयत्नशिल आहे.