हृदयस्पर्शी व्हिडिओ: बाळाच्या रडण्यानं कोमात गेलेली आई जागी झाली

आज शॅली कॉली आणि जेरेमी या पती-पत्नींनी एक वर्षापूर्वीची आठवण जागवली. आज त्यांची मुलगी रायलन एक वर्षाची झाली. पण वर्षभरापूर्वी त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते एक स्वप्न असल्यासारखं त्यांना वाटतं.

Updated: Sep 18, 2015, 04:34 PM IST
हृदयस्पर्शी व्हिडिओ: बाळाच्या रडण्यानं कोमात गेलेली आई जागी झाली title=
Photo: Facebook/Shelly Ann Cawley

मुंबई: आज शॅली कॉली आणि जेरेमी या पती-पत्नींनी एक वर्षापूर्वीची आठवण जागवली. आज त्यांची मुलगी रायलन एक वर्षाची झाली. पण वर्षभरापूर्वी त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते एक स्वप्न असल्यासारखं त्यांना वाटतं.

Photo: Facebook/Shelly Ann Cawley

 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गरोदर शॅलीला लेबर पेन व्हायला लागले. तिची डिलेव्हरी करण्यात आली सी-सेक्शनद्वारे... पण ऑपरेशननंतर ती लगेच कोमात गेली. तिला जागविण्याचे डॉक्टरांनी असंख्य प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही.

अखेर तिथल्या नर्सला एक कल्पना सुचली. तिनं नवजात बाळाला शॅलीजवळ आणलं, बाळाला रडवलं... त्यामुळं त्या निपचित पडलेल्या आईच्या संवेदना जाग्या झाल्या आणि ती कोमातून बाहेर पडली. यासाठी तब्बल एका आठवड्याचा काळ लागला. 

पाहा व्हिडिओ- 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.