बराक ओबामांची मोदींवर स्तुती सुमने

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाची स्पष्ट दृष्टी आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे...असं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय. 

Updated: Dec 3, 2015, 01:30 PM IST
बराक ओबामांची मोदींवर स्तुती सुमने  title=

वॉशिंग्टन : अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाची स्पष्ट दृष्टी आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे...असं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय. 

काय म्हटलं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या पत्रानुसार 

राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रामाणिक आणि थेट स्वभावाचे आहेत. त्यांना सत्यपरिस्थितीची चांगली जाण आहे. याशिवाय त्यांना भारताच्या समस्या आणि अमेरिकेशी त्यांचा असणारा संबंध याचीही उत्तम जाण आहे. त्यांच्याकडे भारताच्या विकासाविषयी दीर्घकालीन दृष्टी आहे. त्यामुळे ते फक्त प्रभावशाली राजकारणी नुसून प्रभावशाली पंतप्रधान बनलेत. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना
मोदींच्या राजकीय कौशल्याचा आदर आहे. त्यांच्या खांद्यावर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही धुरा आहे, हे आव्हान त्यांनी पेललंल्याचही ओबामांनी म्हटलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.