बँकॉक: बँकाकमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याचं कळतंय.
वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकॉकमधील हिंदू मंदिराच्या परिसरात हा बॉम्बस्फोट झाल्याचं कळतंय. इरावन असं मंदिराचं नाव असून या मंदिराच्या परिसरात हा भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. या दृश्यांवरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते आहे. रिमोटच्या सहाय्यानं बॉम्बस्फोट घडवल्याची माहिती मिळते आहे,
आज संध्याकाळी बँकॉकमधल्या इरावन मंदीराजवळ घडलेल्या या स्फोटाची अद्याप जबाबदारी कुणीही घेतलेली नसून पोलीस तपास करत आहेत. इरावन मंदीर हे ब्रह्मदेवाचं १४ व्या शतकात बांधण्यात आलेलं प्राचीन मंदीर असून हिंदूसह हजारोच्या संख्येनं बुद्ध धर्मीयही या मंदीरात दर्शनासाठी येत असतात. या बाँबस्फोटात मंदीरात आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर इजा झाली असून परीसरात प्रचंड प्रमाणात गोंधळाचं वातावरण आहे. या मंदीराजवळच दोन मॉल असून स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्यामुळं परीसरात खूप गर्दी होती.
दरम्यान, अभिनेत्री जेनेलिया डिसूजानं ट्विटरवरून आपण स्फोट झाला त्याच्या जवळच होतो. आम्ही सुखरूप आहोत, पण हे पाहून दुखी असल्याचं जेनेलिया म्हणते.
Bomb set off just opp the mall we are currently in -can hear the sirens blazing all over- we are safe but feel terrible for the lives lost.
— Genelia Deshmukh (@geneliad) August 17, 2015
पाहा सीसीटीव्ही फुटेज-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.