जिनांचं घर दहशतवाद्यांनी केलं उद्ध्वस्त

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं ऐतिहासिक घर दहशतवाद्यांनी बॉम्बनं उडवून दिलंय. पाकिस्तानातील दक्षिण पश्चिमेतील बुलचिस्तान प्रातांतील ही घटना आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 15, 2013, 06:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं ऐतिहासिक घर दहशतवाद्यांनी बॉम्बनं उडवून दिलंय. पाकिस्तानातील दक्षिण पश्चिमेतील बुलचिस्तान प्रातांतील ही घटना आहे. १२१ वर्ष जुन्या असलेल्या ‘आझम रेसिडेन्सी’ या ऐतिहासिक इमारतीवर हल्ला करुन ती जमीनदोस्त करण्यात आलीय. बॉम्ब आणि गोळ्यांच्या वापरामुळे या इमारतीला भीषण आग लागली. या हल्ल्यात एक पोलीसही ठार झालाय.
बलुचिस्तानपासून जवळजवळ १२० किलोमीटर दूर जियारत या ठिकाणी जिना यांचं हे ऐतिहासिक घर आहे. या घराला आग लागल्यानंतर अग्निशमन दल उपलब्ध नसल्यानं आग विझवण्यासाठी वेळ लागल्याचं जिल्हा पोलीस अधिकारी असगर अली यांनी सांगितलं. याप्रकारामुळे त्या संपूर्ण भागाला सुरक्षा दलानं घेरलं असून हल्लेखोरांना पकडण्याच्या मोहिमेला ते लागले आहेत.

असं म्हटलं जातंय की देशाचे संस्थापक असलेले मोहम्मद अली जिन्ना यांनी टीबी झाल्यानंतरचे आपले उरलेले दिवस या इमारतीत घालवले होते. या हल्ल्यामुळे जिन्नांची एकमेव आठवणही जमिनदोस्त झालीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.