मायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार

तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आतापर्यंतची सर्वात मोठी कपातीची योजना केलीय. भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी सत्य नडेला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. 

AFP | Updated: Jul 17, 2014, 06:58 PM IST
मायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार title=

न्यूयॉर्क: तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आतापर्यंतची सर्वात मोठी कपातीची योजना केलीय. भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी सत्य नडेला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. 

कंपनीच्या संघटनात्मक बदलासाठी मागील आठवड्यातच कर्मचाऱ्यांसाठी नडेला यांनी पत्र लिहिलंय. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार मायक्रोसॉफ्ट आज याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 

आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असेल. यापूर्वी 2009मध्ये 5,800 कर्माचाऱ्यांना आपल्या नोकरीवरून काढण्यात आलं होतं, ही सर्वात मोठी कपात होती. मात्र आता त्याहूनही अधिक तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. 

 मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये अनेक भारतीय काम करतात. त्यामुळं कंपनीच्या या कर्मचारी कपातीचा फटका भारतीय नागरिकांना पर्यायानं भारतालाही होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.