`किस` म्हटल्यावर मिसेस ओबामाही लाजल्या...

अन् मिशेल ओबामा लाजल्या... अहो त्याला कारणही तसचं आहे... लग्नाच्या 20व्या वाढदिवशी पहिल्यांदा एका टीव्ही शोमध्ये त्यांनी त्यांचा पहिल्या किसचा अनुभव रंगवला.

Updated: Oct 4, 2012, 07:45 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
अन् मिशेल ओबामा लाजल्या... अहो त्याला कारणही तसचं आहे... लग्नाच्या 20व्या वाढदिवशी पहिल्यांदा एका टीव्ही शोमध्ये त्यांनी त्यांचा पहिल्या किसचा अनुभव रंगवला. मिशेल म्हणाल्या की, मी आणि बराक एके दिवशी जेवण करता-करता गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी अचानक ओबामांनी मला विचारले की, मी तुला किस करू शकतो का? मी लगेच त्यांना होकार दिला. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता.
प्रेमी युगुलाच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेल्या पहिल्या `किस`ला अनन्य साधारण महत्व असते. तर मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा त्याला कसे अपवाद राहतील. बराक यांनी मिशेल यांना घेतलेला पहिला किस आठवून मिशेल ओबामा मनापासून लाजतात.
पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहेत. प्रतिस्पर्धी मिट रोमनींच्या विरूध्दच्या लढतीत ओबामांनी आघाडी घेतली आहे.एका खासगी मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबामांनी जवळपास 50 टक्के आघाडी मिळविली आहे.