नवी दिल्ली : सैबेरियातील एका मुलाला पाहून एका कॉमिकमधला व्हिलन ‘मॅग्नेटो’ याची आठवण नक्कीच होतेय... ‘मॅग्नेटो’चं वैशिष्टयं म्हणजे, कोणतीही वस्तू चुंबकीय बलानं आपल्याकडे तो आकर्षित करून घ्यायचा... आणि हेच वैशिष्ट्यं या ‘रिअल सुपरहिरो’तही दिसून येतंय.
कोलया क्रगलॅन्चेको असं या सात वर्षांच्या मुलाचं नाव... रशियातील मीडियानं या मुलाचं नामकरण ‘मॅग्नेट बॉय’ असं केलंय.
२०१० मध्ये एका बिघडलेल्या फ्रिजचा शॉक आपल्याला लागला, असं कोलया सांगतो. तेव्हापासून चमचे, नाणे आणि आणखीन अशा काही वस्तू त्याच्या शरीराला आपोआप चिकटतात...
सध्या त्याला आपली ही अनोखी ‘पॉवर’ आपल्या शाळेतील इतर मुलांसमोर प्रात्यक्षिक स्वरुपात दाखवायला खूप आवडतंय. त्याला आपण ‘सुपरहिरो’ झाल्याचा फिलही येतो... मात्र, जेव्हा कोलयाला ही ‘पॉवर’ नकोशी असते तेव्हा मात्र त्याचा नाइलाज होतो...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.