मॉस्को : कोपर्डी बलात्काराचा निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी मूक मोर्चे काढले जात असताना आता एक फोटो व्हायरल होत आहे.
रशियात असलेल्या काही मराठा समाजातील तरूणांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी सेंट पिटर्सबर्ग शहरात छोटेखानी मोर्चा काढला.
यावेळी तरूणांच्या हातात प्रिंट आउट काढून आपला निषेध नोंदविला. एक मराठा लाख मराठा, आम्ही लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी, आरक्षण देता की खुर्चा सोडा अशा घोषणा लिहिल्या आहेत.