www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री यांनी म्हटलंय की, 2008 मध्ये मुंबईवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर, भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितलं होतं की, जर पाकिस्तानने आणखी हल्ला केला तर भारत संयम ठेवणार नाही.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ हिलेरी क्लिंटन यांनी दिला आहे.
हिलेरी क्लिंटन यांनी आपल्या `हार्ड चॉइसेज` या पुस्तकात हा संदर्भ दिला आहे. हिलेरींनी पुस्तकात म्हटलंय, "तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी हे स्पष्ट केलं होतं, असा दुसरा हल्ला झाला तर भारत संयम ठेवणार नाही.
पाकिस्तानमधील लष्कर ए तैय्यब्बा या दहशतवादी संघटनेने नोव्हेंबर 2008 साली मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात, पाच अमेरिकन नागरिकांसह 166 जण मारले गेले होते.’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.