बीजिंग : बसमध्ये बसल्यावर आपण ताजी हवा घेण्यासाठी खिडक्या उघडतो. पण असे काहीसे चीनमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने केल्याची धक्कादायक घटना घडली. झेंगझियांग प्रांतातील हँगझू येथील विमानतळावर विमान उड्डाण घेण्यापूर्वी हा प्रकार घडला.
झुझीया नांनपेंगयू या विमानात उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने ही घटना सोशल मीडियावर गेल्या रविवारी शेअर केली. शायमेन एअरलाइन्सचे विमानन चेंगडू येथे जात असताना हा प्रकार घडला. तसेच विमानातील फ्लाइंग अडेंडटला खिडकी उघडण्याचेही हा व्यक्ती सांगत होता.
हा प्रवासी साधारणतः ५० वर्षांचा असावा. तो शांतपणे इमर्जन्सी एक्झीट दरवाज्याजवळ बसला होता. त्याने ताजी हवा येण्यासाठी विमान उडण्यापूर्वी दरवाजा उघडला. ही बाब फ्लाइंग अटेंडंटच्या लक्षात आल्यावर त्याने त्वरित दरवाजा बंद केला आणि या व्यक्तीची जागा बदलली.
हा प्रकार घडला असला तरी विमान वेळेवर उडले आणि प्रवासी सुखरूप आपल्या इच्छित स्थळी पोहचले. पण काही काळासाठी विमानातील वातावरण तंग झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.