पेशावरमधील 'थरार' संपला, १३२ विद्यार्थ्यांसह १४१ बळी

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी आता लहान मुलांनाही सोडलं नसून पेशावरमधल्या लष्करी शाळेत आत्मघातकी हल्ला केला आहे. 

Updated: Dec 17, 2014, 08:27 AM IST
पेशावरमधील 'थरार' संपला, १३२ विद्यार्थ्यांसह १४१ बळी title=

संध्याकाळी ७.१५ वाजता

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांनी आता लहान मुलांनाही सोडलं नसून पेशावरमधल्या लष्करी शाळेत आत्मघातकी हल्ला केला आहे. शेकडो मुलं शिकत असलेल्या शाळेमध्ये सुमारे सात दहशतवादी घुसले असून आत्तापर्यंत त्यांनी १३२ निष्पाप विद्यार्थ्यांसह १४१ जणांना ठार केलं असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यात एक शिक्षक आणि जवानाचाही समावेश आहे. तर सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.  

संध्याकाळी ५.४२ वाजता

पेशावरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा १४१ पोहोचला.

संध्याकाळी ५.१८ वाजता

पेशावरमधील दहशतवादांविरोधातील लष्करी कारवाई अंतिम टप्प्यात - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची माहिती.

दुपारी ४.४५ वाजता

पेशावरमधील दहशतवादी हल्ला हा मानवतेसाठी काळा दिवस : नोबेल विजेते कैलास सत्यार्थी

दुपारी ४.४२ वाजता

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत असून आपण हल्ल्यात मृत पावलेल्या मुलांच्या पालकांसोबत आहोत असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दुपारी ४.०० वाजता
- हल्ल्यामध्ये १२६ विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळतेय... तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत

दुपारी ३.०० वाजता
- हल्ल्यामध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थी ठार, एकूण मृतांची संख्या १०४ वर
- लष्करानं तीन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

My heart goes out to everyone who lost their loved ones today. We share their pain & offer our deepest condolences.

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2014

It is a senseless act of unspeakable brutality that has claimed lives of the most innocent of human beings - young children in their school.

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2014

दुपारी २.४५ वाजता
- हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ४३ वर पोहचला... १०० हून अधिक जखमी
- मृत्यूमुखींमध्ये ४० विद्यार्थी, २ शिक्षक आणि एका पोलिसाचा समावेश
- दहशतवाद्यांनी केली हवाई फायरींग

दुपारी २.२३ वाजता
- हल्ल्यात आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू..... यात २५ शाळकरी मुलांचा समावेश... २ शिक्षक आणि १ पोलीस..  ४५ जण जखमी
- शाळेत १५०० पेक्षा अधिक विद्यार्थी अडकले. 

दुपारी २.०० वाजता
- शाळेच्या इमारतीत सेनेनं मिळवला प्रवेश
- शाळेतूनच दहशतवाद्यांचा गोळीबार, गोळ्यांच्या आवाजानं परिसरात भीतीचं वातावरण

दुपारी १.४५ वाजता
- दहशतवाद्यांनी लष्कराच्या गणवेशात शाळेत प्रवेश मिळवल्याची माहिती.
- जखमी विद्यार्थ्यांच्या पेशावर वेगवेगळ्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दुपारी १.३० वाजता
- हल्ल्यात आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती... मृतांमध्ये १५ शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश
- २८ जण जखमी

पेशावर :  पाकिस्तानच्या पेशावर या शहरात एका आर्मी शाळेवर दहशतवादी हल्ला केलाय. समाचार एजन्सी रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, या शाळेत घुसून दहशतवाद्यांनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी ओलीस ठेवल्याचं समजतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहा-सात दहशतवादी सामील आहेत... या हल्ल्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर २७ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, चार विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 

शाळेत जवळपास ५०० विद्यार्थी अडकल्याची माहिती समजतेय. सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झालंय... शाळेकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेत.  

तहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.