www.24taas.com, वृत्तसंस्था, क्वालालुंपूर
अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.
चीनचे तब्बल १० उपग्रह या विमानाचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आलेत. या उपग्रहांच्या सहाय्यानं विमानासह बेपत्ता झालेल्या २३९ प्रवाशांचाही शोध घेता येणार आहे.
दरम्यान हे विमान पुन्हा क्वालालुंपूरच्या दिशेनं वळलं असावं असे संकेत रडारवर मिळाल्यामुळं त्याचा शोध घेण्याची मोहीम आता थायलंडजवळच्या अंदमान समुद्रापर्यंत विस्तारण्यात आलीये. या शोधमोहीमेत ३४ विमाने, ४० जहाजे, आणि १० देशांमधील पथके सहभागी झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.