बेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय. विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 17, 2014, 09:31 AM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था, क्वालालांपूर
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.
क्वालालांपूरहून बीजिंगला जाणारं मलेशियाचं `एमएच ३७०` हे विमान ८ मार्चपासून अचानक बेपत्ता झालंय. या विमानाच २३० प्रवासी होते. त्यात १५४ प्रवासी चीनचे तर ५ भारतीयही होते. मात्र विमान रडारहून बेपत्ता कसं झालं, याचा विचार अधिकारी करत आहेत. हायटेक रडार आणि इतर सामान असतांनाही विमान बेपत्ता झालं.
मलेशिया पोलिसांनी क्रू मेंबर, पायलट, ग्राऊंड स्टाफ आणि प्रवाशांचा पुन्हा तपास सुरू केलाय. पोलिसांना नव्या लीड्स मिळाल्या आहेत. विमानात जाणूनबुजून बिघाड करण्यात आला आणि रस्ता बदलण्यापूर्वी ट्रांलपोडरचं स्विच ऑफ केला गेला, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.
पोलीस प्रमुख खालिद अबू बकर यांनी सांगितलं की पायलट जहारी अहमद शादच्या घरी सापडलेलं सिमुलेटरचा नाश करण्यात आलाय आणि तपासणीसाठी त्याचे भाग पुन्हा जोडण्यात आले. संरक्षण व परिवहन मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितलं की, `विमानाच्या तपासाचं क्षेत्र आता वाढवण्यात आलंय. सुरूवातील फक्त समुद्रातच तपास केला जात होता. आता मात्र ११ देशांच्या जमिनीवर आणि खोल समुद्रातही तपास केला जातोय.` कजाखस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, भारत, चीन, म्यामां, लाओस, वियतनाम, थायलंड, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि फ्रांस या देशांसोबत मलेशियानं संपर्क साधला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.