लंडन : ब्रिटनच्या एका कोर्टाने साऊदी अरबचे दिवंगत किंग फहद यांची 'गुप्त पत्नी' असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटीश जज पीटर स्मिथ यांनी आदेश दिला की, पॅलेस्टीनमध्ये जन्मलेली ६८ वर्षीय जनान हार्बला मिलियन पाउंड (सुमारे दीड अब्ज रुपये) आणि लंडनमध्ये वचन दिल्यानुसार प्लॅट देण्यात यावा.
महिलेला किंगच्या एका मुलाने वचन दिले होते. या संदर्भात महिलेने दावा केला होता, हा दावा कोर्टाला योग्य वाटला. हार्बने कोर्टाला सांगितले की, १९६८ मध्ये किंग जेव्हा प्रिन्स होते तेव्हा त्यांनी गुप्त विवाह केला होता. प्रिन्स यांनी त्यावेळी आयुष्यभर आर्थिक मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
हार्ब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी ख्रिश्चन असल्याने किंगचा परिवार त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता. पण लग्नानंतर मी इस्लाम कबूल केला होता.
महिलेने दावा केला की किंगची दुसरी पत्नीचा मुलगा अब्दुल अजीज याने २००३ मध्ये तिला आर्थिक मदत करणार असल्याचे वचन दिले होते. दोघांची लंडनच्या एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्यावेळी किंग खूप आजारी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.